सामंजस्य करार क्षणचित्रे

व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने जागतिक स्तरावर 3 डी डिझाइन, इंजिनिअरिंग आणि मनोरंजन प्रणालीमध्ये नेतृत्व करणार्‍या ऑटोडेस्क , इंक (NASDAQ: ADSK) या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. ज्याचा उद्देश देशातील ७६६ औ.प्र.संस्था व ३५१६ व्यवसाय शिक्षण शाळांमधील १६,००० पेक्षा जास्त शिक्षक व ८०,००० विद्यार्थ्यांना प्रमुख तांत्रिक कौशल्ये विकसित करून अंतिमत: देशात रोजगार क्षमता सुधारणे हा आहे. हा सामंजस्य करार प्रारंभिक तीन वर्षाच्या कलावधीसाठी स्वाक्षरी केलेला असून कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) ची महत्त्वची पुष्टी करतात. या सामंजस्य करारावर औ.प्र.संस्था औंध, पुणे येथे दि. १६ जानेवारी २०१३ रोजी आयोजित एका कार्यक्रमात विजय कुमार गौतम, भा.प्र.से, आयुक्त रोजगार व स्वयंरोजगार व संचालक(प्रशिक्षण) महाराष्ट्र शासन आणि जॉर्ज अब्राहम, वरिष्ठ व्यवस्थापक , वर्ल्डवाइड इमर्जिंग मार्केट्स, ऑटोडेस्क एशिया प्रा. लि. यांनी स्वाक्षरी केली

भागीदारीचा एक भाग म्हणून, ऑटोडेस्क एक शिक्षक-केंद्रित दृष्टीकोनाच्या माध्यमातून तांत्रिक शिक्षणास सुधारण्यासाठी उद्योग आणि तंत्रज्ञान भागीदार म्हणून कार्य करेल. गुंतवणूकीत खालील गोष्टींचा समावेश असेल.राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औ.प्र.संस्थासाठी विशिष्ट शिक्षण प्रणाली इलेक्ट्रॉनिक डाउनलोड करणे ज्यामध्ये गुंतवणूकीत खालील गोष्टींचा समावेश असेल: शास्त्रीय विशिष्ट शिक्षण सॉफ्टवेअर सुइट्समध्ये इलेक्ट्रॉनिक डाउनलोड प्रवेश ज्यामध्ये ऑटोकॅड, ऑटोडेस्क माया, ऑटोडेस्क 3 डीएस मॅक्स, ऑटोडेस्क इनव्हेन्टर, ऑटोडेस्क रिव्हिट, ऑटोडेस्क सिव्हिल 3 डी तसेच इतर सर्व ऑटोडेस्क उत्पादनांचा समावेश आहे. या भागीदारीमध्ये अभ्यासक्रम विकसित शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम व डिझाइन स्पर्धेसह प्रभावी प्रशिक्षण कार्यक्रमाचा अभाव आहे.या अभ्यासक्रमामध्ये प्रगत तंत्रज्ञान, उत्पादन, आर्किटेक्चर, अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित असेल.

संचालांनालायाने ऑटोडेस्क बरोबर केलेल्या सहकार्यामुळे राज्यातील सर्व व्यावसायिक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमध्ये आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करण्याची संधी मिळते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जागतिक रोजगार मिळवण्यास व नवीनतम अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा व अध्यापनाचा ज्यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील चालू व भविष्यातील उद्योग जगतातील मानके व जागतिक अपेक्षांचा आणि शैक्षणिक बाबींचा पुरेपूर फायदा मिळवून देण्याची संधी मिळते.