किमान कौशल्यावर आधारीत कार्यक्रम
1.केंद्र शासनाच्या १९८६ च्या नविन शैक्षणिक धोरणानुसार +२ स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रमाचे शिक्षण देऊन जास्तीत जास्त युवकांना रोजगार /स्वयंरोजगार करण्यास प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने राज्यात १९८८-८९ पासुन ७०% व्यवसाय शिक्षण व ३०% सामान्य शिक्षण अंतर्भूत असलेले किमान कौशल्यावर आधारीत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यात आले.
2. प्रत्येकाची रोजगार क्षमता वाढविणे, कुशल कामगारांची मागणी व पुरवठा यांचा समन्वय साधणे तसेच हे अभ्यासक्रम प्रात्यक्षिकाभिमुख असल्याने विद्यार्थ्यांना संबधित व्यवसायाशी निगडीत किमान कौशल्य प्राप्त करुन स्वत:चा उद्योग सुरु करावा अथवा औद्योगिक आस्थापनांमध्ये नोकरी करावी आणि उच्च शिक्षणाकडे जाणारा लोंढा कमी व्हावा हा या योजनेचा उद्देश आहे.
3. या अभ्यासक्रमाचे किमान कौशल्यावर अधारीत अभ्यासक्रम हे नांव उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक २/३/२००९ अन्वये बदलण्यात आले असुन ते उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (H.S.C. Vocational)असे करण्यात आले आहे.
4. सदर अभ्यासक्रम इ.11 वी व इ.12 वी स्तरावर राबविण्यात येतात. सदर अभ्यासक्रम हे शैक्षणिक वर्ष 2015-16 पासून या योजनेतील अभ्यासक्रम सुधारित करण्यात आलेले आहे.
5. केंद्र शासनाने दिलेल्या निदेशानुसार, दि.27 डिसेंबर,2018 नंतर देशातील सर्व कौशल्य शिक्षण/प्रशिक्षण कार्यक्रम हा NSQF (National Skill Qualification Framework) मानकाशी सुसंगत असणे अनिवार्य असून, त्याशिवाय कोणत्याही अभ्यासक्रमाला, उत्तेजन व अर्थसहाय्य देण्यात येऊ नये. ही बाब विचारात घेता, तसेच सद्यःस्थितीत +2 स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम करीता कोणतेही प्रमाणपत्र दिले जात नसल्याची बाब विचारात घेता, हा कोर्स कालबाह्य झाल्याचे स्पष्ट होते. आंतरराष्ट्रीय/राष्टीय स्तरावरील खाजगी क्षेत्रात सदर अभ्यासक्रमात मर्यादीत स्विकारर्हता असल्याने विद्यार्थ्यांना रोजगारांच्या संधी अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. शासकीय कनिष्ठ महाविद्यालयांमधील उपलब्ध पायाभूत प्रशिक्षण मनुष्यबळाचा कौशल्य विकासासाठी महत्तम विनियोगा करण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, शासन निर्णय दि.04.02.2021 अन्वये राज्यातील 53 शासकीय तंत्र माध्यमिक शाळा/केंद्र तथा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या +2 स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांचे विद्यमान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये रुपांतर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
6. अशासकीय अनुदानित संस्थांतील +2 स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांचे रुपांतर करण्याच्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने शासनास शिफारस करण्यासाठी विभागाच्या दि.16.03.2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये मा.श्री.विक्रम काळे, विधानपरिषद सदस्य यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. सदर समितीची कार्यवाही सद्य:स्थितीत सुरु आहे.
7. सदर समितीच्या अद्यापर्यंत सहा बैठका अयोजित करण्यात आलेल्या आहेत सदर समिती दि.31.12.2021 पर्यंत मुदवाढ देण्यात आलेली आहे.
8. सदर समितीकडून शासनास अहवाल सादर करण्यात आल्यानंतर शासनाकडून पुढील कार्यवाही करण्यात येईल.