कार्यासन क्रमांक १
आवक -जावक विभाग (नोंदणी विभाग )
- महाराष्ट्रातील संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय/अशासकीय/औ.प्र.संस्था/शा.ता.वि. यांच्याकडील होणारा पत्रव्यवहार नोंदणी करणे व विषयनिहाय कार्यासनास पाठविणे.
- संचालनालयातून जाणारा सर्व पत्रव्यवहार याची नोंदणी करणे.
- आवश्यकतेनुसार स्पीडपोष्ट/रजिस्टर व इतर तत्सम सुविधा वापरुन पत्रव्यवहार निर्गमित करणे.
- संचालनालयात हस्तदेय टपाल घेऊन येणाऱ्या टपालाची पोच देऊन विषयनिहाय नोंदणी करणे.
- टपाल निर्गमित करताना वापरण्यात येणाऱ्या सर्व टिकीटांची योग्य प्रकारे वापर करुन त्यांचे मुल्य एका नोंदवहीमध्ये घेऊन प्रत्येक महिन्याला कार्यासन अधिकारी/पर्यवेक्षीय अधिकारी यांच्याकडून तपासून घेणे.
- निर्गमित करण्यात येणाऱ्या सर्व पत्रव्यवहार व टपालासाठी आवश्यक असलेली कागदी लिफाफे तयार करणे.
- निर्गमित व येणाऱ्या सर्व टपालाची वर्षनिहाय नोंद याची डिझीटल कॉपी किंवा सीडी वर संकलित करुन ठेवणे.
- न्यायालयीन प्रकरणे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण यांच्या नोटीशी व कामगार न्यायालय यांच्या नोटीशी यांची वेगळी नोंद करुन त्याच दिवशी संबंधित कार्यासनास वितरीत करणे.
- संचालनालयातून मंत्रालयामध्ये होणारा सर्व पत्रव्यवहार याची स्वतंत्र नोंद करुन त्याच दिवशी पोहचविण्याची व्यवस्था करणे.
- माहिती अधिकार प्रकरणे स्वतंत्र नोंदवही मध्ये नोंद घेऊन तात्काळ वितरीत करणे.
- संचालनालयामध्ये येणारे व जाणारे टपाल पत्रव्यवहार याची प्रत्येक महिन्याला प्रिंटआऊट काढून संबंधित कार्यासन अधिकारी यांच्याकडून प्रमाणित करुन घेणे व त्याचा वर्षनिहाय अभिलेख जतन करणे.
- नोंदणी विभागास आवश्यक असलेल्या तिकीटाबाबत/स्पीड पोस्टच्या देय रक्कमेबाबत.वेळोवेळी आढावा घेऊन मागणी सादर करणे व त्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणे.
- पोस्टाकडून प्राप्त होणाऱ्या तिकीटांचा ताळमेळ हिशोब ठेवणे.