STRIVE जागतिक बँक सहाय्यित “औदयोगिक मुल्य वृध्दीकरणासाठी कौशल्यांचे बळकटीकरण करणे “

पार्श्वभूमी

भारताची अर्थव्यवस्था जशी जशी वाढत आहे तशी तशी औद्योगिक आस्थापनाच्या गरजेनुसार जागतिक दर्जाचा कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. तथापी, सदयस्थितीत देशातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रणालीव्दारे वरीलप्रमाणे कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. कुशल मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यामधील तफावत दुर करण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षणाच्या व्यवस्थापनामध्ये औद्योगिक आस्थापनांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने औदयोगिक प्रशिक्षण संस्था तसेच शिकाऊ उमेदवारी अंतर्गत देण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षणाची औदयोगिक आस्थापनांच्या गरजेनुसार प्रासंगिकता व कार्यक्षमता वाढविण्याकरीता जागतिक बँक सहाय्यित “औदयोगिक मुल्य वृध्दीकरणासाठी कौशल्यांचे बळकटीकरण करणे” (Skills Strengthening for Industrial Value Enhancement (STRIVE)  प्रकल्प देशातील सर्व राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

उद्दिष्टे

औद्योगिक मूल्यवर्धनाकरिता कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शिकाऊ उमेदवारी अंतर्गत देण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षणाची औदयोगिक आस्थापनांच्या गरजेनुसार प्रासंगिकता व कार्यक्षमता वाढविणे आणि व्यवसाय प्रशिक्षणाद्वारे कौशल्य प्रशिक्षण प्रदान करण्याची कार्यक्षमता सुधारणा करणे.

योजनेचे स्वरुप

सदर प्रकल्प राबविण्यासाठी देशातील ४०० शासकीय व १०० खाजगी औ.प्र.संस्थांची तसेच १०० Industrial Cluster (IC) यांची निवड करण्यात येणार असून यापैकी महाराष्ट्र राज्यातील ८१ शासकीय १० खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १० Industrial Cluster (IC) ची निवड होणे नियोजित आहे. सदयस्थितीत पहिल्या टप्यात ३४ शासकीय व  ४ खाजगी संस्थांचा तसेच १ Indsustry Cluster तसेच दुस-या टप्यात ३८ शासकीय औ.प्र.संस्था व २ Industry Clusters चा प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. STRIVE प्रकल्पाची सन २०२२ पर्यंत खालील चार घटकांमध्ये राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

 • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यक्षमतेत सुधारणा करणे.
 • औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणासाठी राज्याची क्षमता वाढविणे.
 • औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शिकाऊ उमेदवारी अंतर्गत प्रशिक्षणाची व ज्ञानार्जनाची क्षमता वाढविणे.
 • शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेचा दर्जा व व्याप्ती वाढविणे.
 • याप्रकल्पाची अंमलबजावणी राज्यसरकार, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, Centrally Funded Institute (CFI), Industrial Cluster (IC) यांच्या माध्यमातुन केंद्रशासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता, मंत्रालय यांचेव्दारे करण्यात येणार आहे.

  सदर प्रकल्पासाठी रुपये69 कोटी इतका खर्च अपेक्षित असुन केंद्रशासनाकडून 100% निधी उपलब्ध होणार आहे.

  एकुण प्रकल्प किंमत

   
  अ. क्र. प्रकल्पातील घटक प्रकल्पाचा तपशिल प्रकल्प निधी (रू. कोटीत)
  औद्योगिक प्रशिक्षण क्षमतेच्या कार्यक्षमतेत सुधारणा करणे हजेरीपटावरील प्रशिक्षणार्थ्यांच्या संख्येनुसार सरासरी प्रत्येक संस्थेस रुपये 2.00 कोटी इतका निधी प्राप्त होणार असुन कमाल 81 शासकीय संस्था व अंदाजे 10 खाजगी संस्थांचा प्रकल्पामध्ये समावेश करण्यात येणार आहे. 151.09
  औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणासाठी राज्याची क्षमता वाढविणे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शिकाऊ उमदेवारी प्रशिक्षणासाठी राज्याची क्षमता वाढविण्यासाठी रूपये 29.00 कोटी इतका निधी राज्यास प्राप्त होणार आहे. 29.00
  3 शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेचा दर्जा व व्याप्ती वाढविणे. प्रत्येक Industrial Cluster करीता रूपये 1.00 कोटी याप्रमाणे एकुण रूपये 3.00 कोटी निधी प्राप्त होणार आहे.  3.00
  4 राज्य शिकाऊ उमेदवारी नियंत्रण कक्ष सदर कक्षाच्या मानधन व इतर खर्चासाठी रूपये 0.80 कोटी प्रति वर्षी निधी केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहे. 1.60
  एकूण प्रकल्प निधी 184.69

  .For Detailed Information, Pls. click here.