धोरणे

  • प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासक्रम उदा. माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स,वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स, संगणक हार्डवेअर देखभाल, प्रगत मशीन साधन देखभाल इ. अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देणे

  • कमी रोजगारक्षमता असलेले अप्रचलित व्यवसाय / अभ्यासक्रम बंद करणे.

  • उद्योगजगत व संस्थांमध्ये जास्तीतजास्त सुसंवाद घडवणे.

  • प्रशिक्षण अधिक समर्पक आणि प्रभावी करणे.

  • उद्योगांची मागणी मान्य करणार्‍या कुशल कामगारांचा पुरवठा करणे.

  • व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षणाकरिता अधिकाधिक तरुणांना आकर्षित करणे.

  • पद्धतशीर प्रशिक्षणाद्वारे तरुणांच्या रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या जास्तीतजास्त संधी उपलब्ध करून देणे.

  • सामान्य माणसासाठी व्यावसायिक शिक्षण सुलभतेने उपलब्ध करण्यासाठी व्यावसायिकरण 25% पर्यंत वाढविणे.

  • प्रशिक्षित कार्यबळ प्रदान करून देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी मदत करणे.