+२ स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम

सन 1964 मधील डॉ.कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार अधिकाधिक युवकांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने, रोजगार/स्वयंरोजगार करण्यांस प्रवृत्त करावे, जेणेकरुन महाविद्यालयीन शिक्षणाकडे जाणारा लोंढा थांबावावा. याउद्देशाने 1978-79 पासून राज्यात व्यवसाय विषयांची 30% व्याप्ती असलेले, +2 स्तरावरील व्दिलक्षी  व्यवसाय अभ्यासक्रम  सुरु करण्यांत आले.  सद्यस्थितीत तांत्रिक / वाणिज्य / कृषी  / मत्स्य या गटातील एकूण 16 व्दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यात येतात.

सदर अभ्यासक्रम इ.11 वी व इ.12 वी स्तरावर राबविण्यात येतात.

इ.11 वी मध्ये इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांबरोबरच खालीलपैकी +2 स्तरावरील व्दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमापैकी कोणताही एक अभ्यासक्रम निवडता येतो.  +2 स्तरावरील व्दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम निवडल्यास मराठी, हिंदी/संस्कृत, हिंदी व संस्कृत हे विषय नसतात.

सदर अभ्यासक्रम घेणा-या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रवेशाच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.त्याचबरोबर अभियांत्रिकी शाखेमधील पदविकेच्या (Diploma) व्दितीय वर्षामध्ये प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे.

सदर अभ्यासक्रमांच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे यांचेमार्फत घेण्यात येतात व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येते.

+2 स्तरावरील व्दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम योजनेतंर्गत खालील अभ्यासक्रम राबविले जातात.

[/str]  
अ.क्र. गटाचे नाव +2 स्तरावरील व्दिलक्षी व्यवसाय  अभ्यासक्रमाचे नाव
1 तांत्रिक गट 1.इलेक्ट्रीकल मेंटेनन्स
2.मेकॅनिकल मेंटेनन्स
3.स्कूटर व मोटारसायकल दुरुस्ती
4.जनरल सिव्हील इंजिनिअरींग
5.इलेक्ट्रॉनिक्स
6.कॉम्प्युटर सायन्स
7.केमिकल प्लँट ऑपरेशन
2 वाणिज्य गट 1.बॅकिंग
2.मार्केटिंग ॲण्ड सेल्समनशिप
3.ऑफिस मॅनेजमेंट
4.स्मॉल इंडस्ट्रिज ॲण्ड सेल्फएम्लॉयमेंट
3 कृषी गट 1.ॲनिमल सायन्स ॲण्ड डेअरी
2.क्रॉप सायन्स
3.हॉर्टिकल्चर
4 मत्स्य गट 1. फिश प्रोसेसिंग टेक्नोलॉजी
2.फ्रेश वॉटर फिशकल्चर

सन 2020-21 मधील प्रवेशाची सद्य:स्थिती

अ.क्र. संस्थेचा प्रकार संस्थांची एकूण संख्या प्रवेश क्षमता प्रत्यक्ष प्रवेश (2020-21)
इ.11 वी इ.12 वी
1 शासकीय 49 7350 1897 2657
2 खाजगी अनुदानित 129 11499 7384 6409
3 खाजगी विनाअनुदानित 1512 153695 68189 101346