कार्यासन ६

दक्षता व चौकशी विभाग

  • 2230,2203 मधील राजपत्रीत अधिका-यां विरुध्द प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदाराने तक्रारीमध्ये उपस्थित केलेल्या मुदयांची मुद्दे निहाय चौकशी करुन चौकशी अहवाल सादर करण्याबाबत संचालनालयाचे स्तरावर चौकशी समितीची नियुक्ती करणे.
  • 2230 व 2203 मधील राजपत्रीत अधिका-यांच्या प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करण्याकरिता प्राप्त झालेली तक्रार प्रादेशिक कार्यालयाना कळविणे.
  • प्रादेशिक कार्यालयाने सादर केलेला चौकशी अहवाल/चौकशी अधिका-यांनी सादर केलेला चौकशी अहवाल मा.संचालक यांना सादर करणे.
  • प्रादेशिक कार्यालयाने /चौकशी अधिका-याने सादर केलेल्या चौकशी अहवाला मध्ये काही त्रृटी असल्यास सदर त्रृटीची पुर्तता करुन चौकशी अहवाल सादर करण्याबाबत कळविणे.
  • प्रादेशिक कार्यालयाने/चौकशी अधिका-याने सादर केलेल्या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने चौकशी अहवालातील प्रथम दर्शनी सिध्द होत असलेल्या प्रशासकीय/ वित्तीय/गैरप्रकारा बाबत संबंधित जबाबदार अधिका-यांवर दोषारोप तयार करुन शासनास सादर करणे.
  • 2230,2203 मधील राजपत्रीत अधिका-यांचे विभागीय चौकशीची प्रकरणे हाताळणे.
  • विभागीय चौकशी प्रकरणातील न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
  • 2230 व 2203 मधील राजपत्रीत अधिका-यांना लाच लुचपत प्रतिबंधक अधिका-याने लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडल्यानंतर संबंधित अधिका-यांना निलंबीत करण्याकरिता शासनास प्रस्ताव सादर करणे.
  • राजपत्रीत अधिका-यांचे सेवा निवृत्ती/आस्वासीत प्रगती योजना/पारपात्र/सरळसेवेने अन्य विभागात नियुक्ती करिता ना-विभागीय चौकशी प्रमाणपत्र देणेबाबतची कार्यवाही करणे.
  • कार्यासनाशी संबंधित असलेल्या विषयाबाबत उपस्थित झालेला विधान सभा प्रश्न/ताराकिंत प्रश्न/अताराकिंत प्रश्नाची माहिती शासनास सादर करणे.
  • केंद्र शासन माहितीचा अधिकार अधिनियम-2005 अंतर्गत या कार्यासनाशी संबंधित असलेली माहिती अर्जदाराने मागणी केली असता उपलब्ध माहिती संबंधित अर्जदारास पुरविण्याची कार्यवाही करणे.
  • शासनाचे पी.जी.पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करणे.
  • शासनाचे आपले सरकार या पोर्टलवर प्राप्त झालेलया तक्रारींचे निकरण करणे.
  • कार्यासनातील कामकाजाच्या अनुषंगाने मा.लोक आयुक्त/उप लोक आयुक्त कार्यालया कडून मागविण्यात आलेला अहवाल सादर करणे.