अखील भारतीय परीक्षा व्यवस्थापन विभाग व प्रमाणपत्र वितरण
- डी.जी.टी., नवी दिल्ली यांचेमार्फत आयोजित सर्व अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेची कामे
- शासकीय औ.प्र.संस्थांमधून उत्तीर्ण होणा-या प्रशिक्षणार्थ्यांना राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाही (NTC)
- प्रमाणपत्रे पडताळणी
औ.प्र. संस्थांमधून उत्तीर्ण होणा-या प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या नोकरीसाठी आवश्यक सरकारी आस्थापनांना (रेल्वे/सेना/सार्वजनिक उपक्रम, इ.) एनसीव्हीटी / एससीव्हीटी प्रमाणपत्रे प्रमाणित व तपासणी करुन त्यांचा अहवाल त्या आस्थापनांना पाठविणे. तसेच परदेशामध्ये जाणा-या प्रशिक्षणार्थ्यांचे त्यांच्या मागणीप्रमाणे प्रमाणित करुन देणे. सदर सेवा आपले सरकार पोर्टलवर नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
- परीक्षा विभागास लागणा-या लेखनसामुग्री व इतर आवश्यक असणा-या सर्व साहित्याची खरेदी परीक्षा शुल्कांन्वये जमा होणा-या संचालनालयाच्या स्वीय प्रंपंची खाते (PLA) कार्यासनाच्या स्तरावर करणे व त्याच्या नोंदी अद्ययावत ठेवणे (शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र.आयटीआय-2010/59/प्र.क्र.32/व्य.शि-3 दि. 25/05/2015)
- माहिती अधिकार अधिनियम 2005 संबंधीचे सर्व कामकाज.
- विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजासंबंधीची माहिती हाताळणे.