कार्यासन १७
विधी व न्याय विभाग
- संचालनालयातील व संचालनालयाच्या अधिपत्याखालील ज्या प्रकरणामध्ये संचालनालयाचा संबंध येतो अशा प्रकारची सर्व कार्यासनाचे न्यायालयीन प्रकरणे हाताळणे व त्यानुषंगाने मा. न्यायालयात शपथपत्र दाखल करणे.
- मा.उच्च न्यायालय व इतर न्यायीक कार्यालय यांच्याकडून येणाऱ्या नोटीशी किंवा अपिल प्रकरण हाताळणे.
- मा.महाराष्ट्र प्रशासनिक न्यायाधिकरण ख्ंडपीठ मुंबई व नागपुर येथे दाखल करण्यात आलेली प्रकरणे हाताळणे व तयाबाबतची संपुर्ण कार्यवाही करणे.
- कामगार न्यायालय यांच्याकडील सर्व प्रकरणे हाताळणे
- अपिल दाखल करणे किंवा पुर्नविलोकन दाखल करणे याबाबतची संपुर्ण कार्यवाही करणे
- संचालनालयाशी संबंधीत न्यायीक/मॅट यांच्या सुनावनीसाठी उपस्थित राहणे किंवा प्रतिनिधी यांची नेमणूक करणे
- मंत्रालय स्तरावरुन न्यायीक प्रकरणे/मॅट प्रकरणे यांना आवश्यक असलेली व मागविलेली माहिती तयार करुन पाठविणे.
- सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या ठिकाणी असणाऱ्या सुनावणी यासाठी नेमुन दिलेल्या सरकारी अभियोक्ता यांच्या मागणीप्रमाणे संबंधित कागदपत्रे पुरविणे व माहिती तयार करुन देणे तसेच या सुनावणीसाठी हजर राहणे किंवा प्रतिनिधींची नेमणुक करणे.
- संचालनालयास आवश्यक असल्यास न्यायीक प्रकरण दाखल करण्याची संपूर्ण तयारी करुन प्रकरण दाखल करणे व त्याचा पाठपुरावा करणे.
- संचालनालय स्तरावर व संचालनालयाच्या अधिपत्याखालील कार्यालयामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणाचा निपटारा करणे व त्याबाबत मार्गदर्शक सुचना निर्गमित करणे.
- संचालनालय व अधिपत्याखालील कार्यालय यामध्ये निकाली निघालेल्या प्रकरणाचा मासिक व वार्षिक आढावा घेणे.
- माहिती अधिकार अधिनियम 2005 व लोकायुक्त प्रकरण सबंधीचे सर्व कामकाज.
- विधानमंडळ संबंधित कामकाज हाताळणे.
- लोकआयुक्त /राज्य माहिती आयोगासंबंधी कामकाज
- अशासकीय संस्था संदर्भात संपुर्ण न्यायालयीन प्रकरणांचे कामकाज