विकसित महाराष्ट्र २०४७
विकसित महाराष्ट्र २०४७ साठी कौशल्य विकासावर नागरिकांचा अभिप्राय
विकसित भारत २०४७ या राष्ट्रीय मोहिमेचा भाग म्हणून महाराष्ट्र शासन विकसित महाराष्ट्र २०४७ साठी स्वतःचा आराखडा तयार करत आहे. या उपक्रमाचा उद्देश एक प्रगत आणि भविष्यकालीन महाराष्ट्र घडवण्याचा आहे, ज्यामध्ये कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता यावर विशेष भर दिला जात आहे. हे घटक सक्षम कार्यबल निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी अत्यावश्यक आहेत. या दृष्टी आराखड्यात २०२९, २०३५ आणि २०४७ अशी तीन महत्त्वाची टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यासाठी आपले सुचवलेले विचार विभागाकडून मागवले जात आहेत.
यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने नागरिक सहभाग उपक्रम सुरू केला आहे.
या फॉर्मद्वारे आम्ही आपले अभिप्राय, कल्पना आणि सूचना गोळा करत आहोत. नागरिक — विद्यार्थी, युवक, महिला, व्यावसायिक, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, उद्योग, शिक्षक, निवडून आलेले प्रतिनिधी, नागरिक समाज संस्था आणि लोकप्रतिनिधी ह्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
कृपया लक्षात घ्या की आपल्या विचारांची व महत्वाच्या सल्ल्यांची नोंद करण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०२५ आहे.
नागरिक आणि कर्मचारी सर्वेक्षण फॉर्म लिंक: येथे क्लिक करा