महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल, जिल्हा रायगड यांच्या वतीने, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित "सेवा पंधरवडा" अंतर्गत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ ग्रामपंचायत कार्यालय, गव्हाण, ता. पनवेल, जि. रायगड येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय मंगल प्रभात लोढा, मंत्री (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नविन्यता, महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते झाले.तसेच या प्रसंगी संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य माननीय सरदेशमुख मॅडम,सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य माननीय सूर्यवंशी साहेब,सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, मुंबई , माननीय निकम साहेब हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान माननीय मंत्री महोदयांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेलमधील प्रशिक्षणार्थ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर माननीय सरदेसमुख मॅडम यांनीही उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.