Private ITI

कायम विनाअनुदानित तत्त्वावर नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (खाजगी ITI) सुरू करण्याबाबत कार्यपद्धती

नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासाठी मानकानुसार आवश्यक जागेची उपलब्धता, कार्यशाळा, ट्रेडनिहाय आवश्यक यंत्रसामग्री व उपकरणे, पायाभूत सुविधा, विद्युत भार , निधीची उपलब्धता, तसेच इतर आवश्यक निकष व अटी याबाबतची सविस्तर माहिती संबंधित शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे.
1. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, यांचा शासन निर्णय क्रमांकः आयटीसी-२२१७/ प्र.क्र.२३२/ व्यशि-३, दि.07/02/2018.
2. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे शासन शुध्दीपत्रक क्रमांक: आयटीसी-२२१७/ प्र.क्र.२३२/ व्यशि-३, दि. 23/05/2019.

1. पोर्टल सुरू होण्याबाबतची सूचना :

नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्याबाबतची जाहिरात / सूचना पोर्टल सुरू होण्यापूर्वी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात येते. त्यानुसार इच्छुक संस्था / संस्थाचालकांनी विहित कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

2. अर्ज सादर करण्याबाबत :

कायम विनाअनुदानित तत्त्वावर नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करू इच्छिणाऱ्या इच्छुक संस्था / संस्थाचालकांना दरवर्षी https://vti.msbsvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करता येतात. सदर अर्ज सादर करण्यासाठीचे पोर्टल वर्षातून एकदा निर्धारित कालावधीकरिता सुरू करण्यात येते.

३. अर्ज करण्याची कार्यपद्धती :

नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासाठी तसेच त्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे इरादापत्र (Letter of Intent) प्राप्त करण्यासाठी अनुसरावयाची कार्यपद्धती महाराष्ट्र शासनाच्या संबंधित शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे.

4. इरादापत्र (LOI):

पोर्टलवर प्राप्त अर्जांचे डेस्कटॉप अॅसेसमेंट केल्यानंतर पात्र असणारे अर्ज शिफारसीसह शासनाकडे सादर करण्यात येतात व शासनाकडून मान्यता (ईरादापत्र) प्रदान करण्यात येते.

5. संलग्नता प्राप्त करणे:

इरादापत्र प्राप्त झाल्यावर संस्थेला DGT, नवी दिल्ली यांच्या Affilation Portal वर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. सर्व निकष पुर्ण करणा-या संस्थांचे DGT यांच्या प्रतिनिधींकडून Joint Inspection करण्यात येते व शिफारस प्राप्त संस्थांना DGT नवी दिल्ली यांचे कडून संलग्नता प्रदान करण्यात येते.
संलग्नतेचे निकष: ITI Affilation Norms 2025

6. प्रवेशपरवानगी प्राप्त करणे:

DGT, नवी दिल्ली यांची संलग्नता प्राप्त झाल्यावर संचालनालयाकडून प्रवेश परवानगी प्राप्त करून घेतल्यावर संस्थांना संबंधित व्यवसायांमध्ये online admission portal द्वारे प्रवेश करता येतात.
तरी, नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास इच्छुक असलेल्या संस्था / संस्थाचालकांनी online पद्धतीने portal वर अर्ज सादर करण्यापूर्वी नमूद केलेले संबंधित महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय काळजीपूर्वक वाचून त्यामधील अटी, शर्ती, निकष व कार्यपद्धती यांची माहिती करून घ्यावी.